चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...
चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...
चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...
चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...
चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...
चला विश्वातील आपला आकार पाहूया...
सजीव सृष्टी असलेली आपली पृथ्वी...
पृथ्वीच्या तुलनेत शनी ग्रहाचा आकार...
शनी ग्रहाच्या तुलनेत सूर्याचा आकार...
सूक्ष्म ठीपक्याएवढ्या सूर्याच्या तुलनेत
आपल्या आकाशगंगेचा आकार...
विश्वात आपल्या आकाशगंगेसारख्या अगणित आकाशगंगा आहेत...

आपल्या मोबाईलवर Whatsapp मध्ये  खगोलशास्त्रावरील नियमित अपडेट मिळविण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

खालील लिंक 👇 वर क्लिक करून ग्रुप Join करा.
https://chat.whatsapp.com/K6QH39lYKgdKnNrVd0c6Qb

टीप – हि लिंक आपण इतरांनाही फॉरवर्ड करू शकता.
तसेच आपण जर लॅपटॉप वर वेबसाईट पाहत असाल तर वरील लिंक मोबाईल मध्ये Whatsapp वर पाठवून त्यावर क्लिक करा.

जानेवारी २०२४ या महिन्यातील आकाशातील ग्रहाची स्थिती जाणून घेण्यासाठी
इथे क्लिक करा

आजचा दिवस

आज दिनांक :

सूर्योदय :

सूर्यास्त :

चंद्रोदय : 

चंद्रास्त :

चंद्रकला / तिथी :

आजची चंद्रकला

आजचे सौरडाग

वरील चित्रावर क्लिक करा.

ओळख सूर्यमालेची

सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ८ ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांसोबत लघुग्रह आणि धुमकेतू

आकाश, अवकाश आणि अंतराळ

सूर्यमालेतील ग्रह आणि त्यांचे उपग्रह

सूर्यमालेत सूर्याभोवती फक्त ग्रहच नाही तर त्यांच्या उपग्रहांसोबत लघुग्रह आणि धुमकेतू यांचा देखील समावेश होतो.

अनुभवायच्या खगोलीय घडामोडी

पृथ्वीवरून पाहताना दुर्बिणीशिवाय आपण धूमकेतू, उल्कावर्षाव, अरोरा या मनोरंजक गोष्टी अनुभवू शकतो.

अंतराळातील अद्भुत गोष्टी

आपल्या आकाशगंगेबाहेरील गोष्टींमुळे आपण किती विश्व किती मोठे आहे आणि आपण किती लहान ते कळते.

01

अंतराळ

अंतराळ

विश्व किती मोठे आहे? हे कोडे अजूनतरी मानवाला उलगडलेले नाही, म्हणूनच विश्वाची व्याप्ती सांगताना अनंत हा शब्द जोडला जातो. ज्याला अंत नाही असा अनंत. परंतू निसर्ग नियमांमध्ये प्रत्येकाला मर्यादा आहेत, कोणतीही वस्तू आपली मर्यादा ओलांडू शकत नाही. मग हाच नियम बहूदा विश्वाला देखिल लागू होत असावा.

02

आपली आकाशगंगा

आपली आकाशगंगा

आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती ‘मंदाकिनी’ नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे. अवकाशातील सर्वच गोष्टीचे एकमेकांपासून अंतरच फार असल्याने दोन अवकाशीय गोष्टींमधील अंतर प्रकाशाच्या वेगाने मोजले जातात. आपल्या पृथ्वीवरून दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेमधील आहेत याचाच अर्थ आपल्या आकाशगंगेचा आकार प्रचंड मोठा आहे.

03

आपली सूर्यमाला

आपली सूर्यमाला

सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. पण त्यापैकी बहुतांश तारे आपण पाहू शकत नाही. रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेतील आहेत.

विश्वाची व्याप्ती

अनंत पसरलेल्या या विश्वात अगणित अनाकलनीय गोष्टी आहेत.

आपली लाडकी – पृथ्वी

सूर्य आणि सूर्यमाला

मंदाकिनी आपली आकाशगंगा

कृष्णविवर - अवकाशातील विवर

अगणित आकाशगंगांचा पसारा

अनंत पसरलेल्या विश्वाचा कोडे

आपली लाडकी – पृथ्वी

सूर्यमालेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली लाडकी पृथ्वी. या व्यतिरिक्त आणखी दुसर्‍या शब्दांमध्ये वर्णन करायचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आजपर्यंत केलेल्या संशोधनानंतर हे आढळून आले आहे की या ग्रहा व्यतिरिक्त इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.

सूर्य आणि सूर्यमाला

सूर्यमालेतील आपल्या भोवती फिरणारे ८ ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, धुमकेतू या सर्वांना घेऊन आकाशगंगेमध्ये फिरणारा सूर्य हा खरोखरच आपला प्राणदाता आहे, त्याच्यामुळेच सूर्यमालेतील सर्व गोष्टी एखाद्या सजीवाप्रमाणे भ्रमण करत आहेत.

मंदाकिनी आपली आकाशगंगा

आपल्या सूर्याप्रमाणे साधारण २०० अब्ज तारे असलेली आपली आकाशगंगा म्हणेज आपली मंदाकिनी आकाशगंगा. आपल्याला रात्री आकाशात दिसणाऱ्या सर्वच गोष्टी या आपल्याच आकाशगंगेतील आहेत. प्रचंड मोठ्या या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला प्रकाशालाच एक लाख वर्ष लागतात.

कृष्णविवर – अवकाशातील विवर

गुरुत्वाकर्षण हि विश्वातील एकमेव गोष्ट आहे जी या विश्वातील सर्व गोष्टींना एकत्रित धरून ठेवते. प्रचंड गुरुत्वाकर्षणाचे एकमेव उदाहरण म्हणजे कृष्णविवर. ज्यामधून प्रकाशाला देखील बाहेर पडणे शक्य नाही. केंद्रभागी असेलेल्या एका काळ्या गोष्टीभोवती फिरणाऱ्या महाकाय आकाशगंगेवरूनच कृष्णविवराच्या अजस्त्र ताकदीची कल्पना आपण करू शकतो.

अगणित आकाशगंगांचा पसारा

प्रचंड आकारमान असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या शेजारच्या काही आकाशगंगा मिळून होणारा स्थानिक आकाशगंगांचा समूह अन अशा काही स्थानिक समूहांच मिळून होणारा महासमूह. असे अगणित महासमूह अंतराळात पसरलेले आहेत. आपण जितके याबद्दल जाणतो तितकेच पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला कळलेल्या देखील नाही आहेत.

अनंत पसरलेल्या विश्वाचा कोडे

एखादे कोडे जितके मोठे तितके त्याला सोडवायला लागणारा वेळाही मोठा असतो. सजीवाच्या उत्क्रांतीला काही लाख वर्षे जरी झाली असली तरी विश्वाच्या आयुष्याच्या मानाने आपण फक्त काही सेकंदाचे आहोत. अनंत पसरलेल्या विश्वाला आपण जसजसे समजत आहोत तितकीची त्याची व्याप्ती अजून जास्त असल्याचे आपणास कळत आहे. विश्वाचे हे कोडे सध्यातरी आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठे आहे.

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापेक्षा खरा आनंद मिळतो,
तो अमावास्येच्या रात्री दिसणाऱ्या अगणित सूर्यांना पाहण्यात.