जर सूर्यास्तानंतर अथवा मध्यरात्रीपूर्वी आकाशामध्ये आपल्याला चंद्राची अर्धी बाजू दिसत असेल म्हणजेच "अर्धचंद्र बिंब" दिसत असेल तर त्या रात्री चंद्र साधरणपणे मध्यरात्रीपर्यंत पश्चिमेला मावळता दिसेल. याचाच अर्थ तेव्हा चंद्राची 'शुक्ल अष्टमी' कला असून साधारण आठ दिवसांपूर्वी अमावास्या होती व साधारण आठ दिवसांनंतर पौर्णिमा असेल. |