शोधल्या गेलेल्या धुमकेतूंना नावे देण्याच्या पदधतीमध्ये वर्षे आणि पंधरवडा (महिन्यातील १५ दिवस) यांचा उपयोग केला जातो. प्रत्येक महिन्यातील (दोन) पंधरवडयासाठी इंग्रजीतील अक्षरे कॅपिटल (capital) स्वरुपात घेतली जातात. उदा. (A) = १- १५ जानेवारीसाठी ,(B) = १६- ३१ जानेवारीसाठी, (C) = १- १५ फेब्रुवारीसाठी, ई. ( परंतू यामध्ये इंग्रजीतील अक्षरातील ; (I) आणि (Z) अक्षरे वापरली जात नाहीत .
तसेच एखाद्या पंधरवडयात जर एकापेक्षा जास्त धूमकेतू शोधले गेल्यास त्यांना अनुक्रमे १,२,३ ई. असे अंक वापरले जातात.
समजा एखादा धुमकेतू एप्रिलच्या पहिल्या आठवडयात शोधला गेला तर त्याला C/2007 G1, C/2007 G2, C/2007 G3 अशी नावे देण्यात येतील.
C/2007 G1 - सुरुवातीला 'C' हा 'Comet' (धुमकेतू) पासून घेतला आहे. '२००७' हे धुमकेतू शोधल्याचे वर्ष. 'G' म्हणजे हा धुमकेतू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शोधला गेला .