आकाशामध्ये आपण ज्या काही वस्तू पाहतो त्याच्या दिसण्यावरुन तीची दृष्यप्रत ठरविली जाते. म्हणजेच एखादी वस्तू जितकी तेजस्वी तितकी तीची दृष्यप्रत ऋण ( - ) चिन्हाने दर्शविली जाते तर एखादी वस्तू जितकी अंधूक तीची दृष्यप्रत धन ( + ) चिन्हाने दर्शविली जाते.
पृथ्वीवरुन आकाशामध्ये पाहताना आपल्याला सूर्य अधिक प्रखर आणि तेजस्वी दिसतो तर रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये पाहताना हजारो तार्यांमधिल काही तारे तेजस्वी तर काही फारच अंधूक दिसतात. म्हणूनच अवकाशीय वस्तूंना अभ्यास करताना त्यांच्या दृष्यप्रतीचा देखिल उल्लेख केला जातो.
खालील तक्त्यामध्ये दृष्यप्रतीनुसार आपल्याला दिसणार्या वस्तू दर्शविलेल्या आहेत.