खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दरवर्षी जरी होत असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रग्रहण उशिरा मध्यरात्री झाल्याने सर्वसाधारण माणसाला चंद्रग्रहण पाहिल्याचे तसे फारसे आठवत नाही. परंतू यावेळी हा अनुभव घेता येणार आहे. कारण यावेळचे चंद्रग्रहण पूर्ण खग्रास असून ते संध्याकाळी सुरु होत आहे.
संपूर्ण भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई मध्ये हे खग्रास चंद्रग्रहण संध्याकाळी ६.१५ वा. सुरु होईल तर साधारण तीन तासांनी रात्री ९.४८ वा. संपेल. मुंबई सोडून तर राज्यांतून चंद्रग्रहणाच्या वेळेमध्ये काही मिनिटांचा फरक आढळेल. |