महिन्याच्या सुरुवातीला सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रह नंतर सूर्यापासून दूर जात जात महिना अखेर पर्यंत १९ अंशापर्यंत जाईल तेव्हा आपण त्याला पाहू शकता. आपणास तो पश्चिम क्षितिजावर मिथुन तारकासमुहातील प्लक्ष तार्याच्या डाव्याबाजूला आढळेल. सूर्यापासून जास्त दूर नसल्याने फक्त चांगले निरभ्र आकाश असेल तरच आपण त्याला एखाद्या उंच ठिकाणाहून व्यवस्थित पाहू शकता. |