दिनांक ९ मे २०१० रोजी चंद्रकोरीच्या थोडासा खाली आपल्याला गुरु ग्रह आढळेल.
दिनांक १६ मे २०१० रोजी शुक्र-चंद्र यांची पिधान युती होणार आहे. यादिवशी (वेळ : दुपारी ४ ते ५.२० वा.) या काळामध्ये शुक्र ग्रहावरुन चंद्र पुढे सरकताना दिसेल.
दिनांक २० मे २०१० रोजी अर्धचंद्रबिंबाच्या थोडासा बाजूला आपल्याला मंगळ ग्रह आढळेल.
दिनांक २२-२३ मे २०१० रोजी चंद्रबिंबाच्या थोडासा बाजूला आपल्याला शनी ग्रह आढळेल.
दिनांक २६ मे २०१० रोजी बुध ग्रह सूर्यापासून साधारण २५ अंश इतक्या दूर जाईल तेव्हा आपल्याला तो पाहता येईल.