पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

अवकाशवेध.कॉम संबंधी

 

सर्वांनाच नसली तरी अवकाशाबद्दलची जिज्ञासा बहुतेकांना असते. विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषा प्रगती करीत असताना खगोलशास्त्र आणि अवकाश-विज्ञान या विषयामध्ये देखिल इंटरनेटच्या माध्यमातून मराठी माणसाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने अवकाशवेध.कॉमची निर्मिती केली गेली आहे.

आभार

अवकाशवेध.कॉम ही संकल्पना मला स्वतःला सुचली आणि मी ती प्रत्यक्षात आणली. प्रत्यक्षात जरी मी वेबसाइट डेव्हलपर आणि हौशी खगोलशास्त्रज्ञ असलो तरी खगोलशास्त्रावरील वेबसाइट एकट्याने बनविताना खरंच मला थोड्याफार अडचणी आल्या. परंतु सर्वांपासून मिळालेल्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले.

   

माझा पहिल्या अवकाश निरीक्षणामध्ये श्री. पराग महाजनी आणि श्री. मयांक वाहिया यांचे अवकाशासंबंधी ज्ञान पाहून मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो. त्या बद्दल त्यांचे आभार.

   

मुंबई विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण विभागाद्वारे घेतल्या जाणार्‍या 'बेसिक कोर्स इन ऍस्ट्रॉनॉमी' ह्या कोर्सचा मला माझे खगोलशास्त्रातील ज्ञान वाढविण्यासाठी फार मदत झाली. तसेच कोर्सचा एक भाग म्हणून मला पुणे येथील जी. एम. आर. टी. ( जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलेस्कोप ) पाहायला मिळाले. त्या बद्दल मुंबई विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण विभागातील संचालक मुग्धा कर्णिक यांचे आभार.

   

नक्षत्राबद्दलची उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल 'नक्षत्र विहार' या पुस्तकाचे लेखक
श्री. एल.के.कुलकर्णी यांचे आभार.

   

अनेक अवकाश निरीक्षणामध्ये मला माझ्या खगोलशास्त्रावरील कोर्समधिल मित्रांची नेहमीच मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार.

   

अनौपचारिकरीत्या या अवकाशवेध.कॉम वेबसाइटचे उद्घाटन केल्याबद्दल खगोलशास्त्रातील मानाचे स्थान असलेल्या श्री. जयंत नारळीकर यांचे आभार.

   

वेळोवेळी खगोलशास्त्रावरील चांगली व्याख्याने आयोजित केल्याबद्दल नेहरू तारांगण, मुंबई यांचे आभार.

   

अवकाशवेध.कॉम वरील माहितीमधील चुका सुधारण्यासाठी मला मोलाची मदत केल्याबद्दल साधना देगांवकर यांचे आभार.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी