पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

ओळख माझी

 

विज्ञानाची आणि खगोलशास्त्राची आवड तशी लहानपणा पासूनच होती. परंतु परिस्थितीमुळे हे छंद जोपासता आले नाहीत. नंतर सहजच एकदा नेहरू तारांगणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामुळे लहानपणीच्या त्या छंदास चालना मिळाली.

नोकरी आणि नेहमीची इतर कामे सांभाळत केलेल्या वाचनामुळे आणि आकाश निरीक्षणामुळे ग्रह आणि तार्‍यांविषयी चांगलीच आवड निर्माण झाली. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात असल्यामुळे इंटरनेटच्या मदतीने खगोलशास्त्रासंबंधीचे एक मोठे दालन माझ्या समोर उघडे झाले. साहजिकच ही माहिती पूर्णपणे इंग्रजीमध्ये होती. त्यामुळे सुरुवातीला समजण्यासाठी थोडा फार त्रास झाला. खगोल शास्त्राचा अभ्यास करताना एका गोष्टीचे मला जास्तीत जास्त आश्चर्य वाटले ते म्हणजे ह्या विषयावरील जास्तीत जास्त पुस्तके मला आढळलीत ती म्हणजे माझ्या मातृभाषेमध्येच म्हणजे मराठीमध्ये.

वाचनामुळे आणि कॉम्प्युटर वरील निरनिराळे अवकाशासंबंधीचे प्रोग्रॅम हाताळल्यामुळे आकाशातील अनेक तार्‍यांची व ग्रहांची नावे आणि इतर माहिती मिळाली. परंतु मला जास्तीत जास्त आवड होती ती वाचनात आणि आवडीचा विषय होता तो आपली २७ नक्षत्रे.

इंटरनेटवरती काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपणास अवकाश या संबंधीत माहिती ही भारत सोडून इतर देशांमधून झालेल्या संशोधनावरील आहे. तसे पाहता भारतीय संस्कृतीमध्ये व इतिहासामध्ये पाहिल्यास पूर्वीपासूनच आपल्या इथे सुद्धा अवकाश या विषयावर संशोधन झाल्याचे दिसून येते. परंतु आजदेखील आपण या विषयावर हवी तेवढी प्रगती केलेली नाही. ग्रह तार्‍यांविषयी व इतर सर्व तारकासमुहांविषयी आज इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे. परंतु आपल्या भारतामधील संशोधकांनी तारकांचा अभ्यास अधिक सुलभ व्हावा यासाठी अवकाशातील काही ठराविक तारका समूहांना 'नक्षत्र' हे नाव दिले. इतर सर्व माहिती जरी इंटरनेटवर मिळत असली तरी आपल्या नक्षत्रा संबंधी कोणतीही माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध नाही आणि हाच विचार करून मी ही माझी वेबसाइट नक्षत्रांवर आणि खास करून मराठीमध्ये करण्याचे ठरविले.

जरी बहुतेक ठिकाणी मी 'आम्ही' हा शब्द वापरला असला तरी हा शब्द मी स्वतःसाठीच वापरला आहे. 'मी' पणाचा गर्व ( सारखा उच्चार ) न होण्यासाठी मी 'आम्ही' हा शब्द वापरला आहे. त्यामुळे कमी ऐवजी जास्त चुका माझ्या हातून होण्याच्या शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी माहितीमध्ये छोटीशी देखिल चूक आपणास आढळून आल्यास कृपया मला कळवावे. कोणताही शब्द चुकीचा टाईप झाल्यास ( व्याकरण चुकल्यास ) मला कळवावे. आपण दाखविलेली प्रत्येक चूक लगेच सुधारण्यात येईल. तसेच ह्या वेबसाइट बद्दल कोणत्याही सूचना / बदल आपण सुचवू शकता.

साहजिकच प्रत्येक माहिती ही एखाद्या दुसर्‍या माहितीच्या आधारेच निर्माण होते. त्याचप्रमाणे या वेबसाइट वरील सर्व माहिती मी पंचांग, पुस्तके, वर्तमानपत्रे व इतर लेखकांच्या मदतीनेच मिळवली आहे. ही संपूर्ण माहिती मी माझ्या परीने योग्य ते संशोधन करूनच जमविलेली आहे. तरी त्यामध्ये काही चुका व त्रुटी असण्याची शक्यता आहेत. जर आपणास काही चुकीचे आढळल्यास कृपया मला कळवावे. आपण दिलेल्या माहितीच्या आधारेच मला ही वेबसाइट परिपूर्ण करायची आहे.

- सचिन सखाराम पिळणकर

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी