ठिकाण - मुंबई, महाराष्ट्र, भारत अक्षांश - १८.५८ उत्तर रेखांश - ७२.४९ पूर्व वातावरण - २५ % ढगाळ वातावरण निरीक्षणाची वेळ - सायंकाळी ४.१३ ते ६.०४
साहित्य
१) ४ इंची दुर्बिण
२) २५ मी.मी. आयपिस (लेन्स)
३) ओराईट वि.सी. ३०१०Z - ३.३ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा
थोडक्यात माहिती - दिनांक ३१ डिसेंबर २००९ रोजी भारतामधून 'खंडग्रास चंद्रग्रहण' दिसले. साधारणपणे एका महिन्यामध्ये एक पौर्णिमा व एक आमावस्या येते पण काही काळानंतर एकाच महिन्यामध्ये दोन पौर्णिमा अथवा दोन आमावस्या येते. जर एखाद्या महिन्याच्या सुरुवातीलाच जर एखादी आमावस्या आल्यास त्याच महिन्यामध्ये दोन पौर्णिमा येण्याची शक्यता असते. यालाच इंग्रजीमध्ये 'ब्लू मून' असेही म्हणतात. प्रत्यक्ष्यात इथे 'निळा चंद्र' दिसत नाही. कारण ही फक्त एक म्हण आहे.
डिसेंबर २००९ या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ३ तारखेला पौर्णिमा आल्याने ३१ डिसेंबरला देखिल पौर्णिमा आली. तसेच योगायोगाने या दुसर्या पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण झाले.
चंद्रावर पडलेल्या पृथ्वीच्या सावलीचा भाग
हा निळा चंद्र (Blue Moon) नसून चांगल्या प्रकारे छायाचित्रे यावीत यासाठी निरनिराळ्या रंगाच्या छटा वापरुन कॅमेर्यामधून छायाचित्रे काढली जातात.
टीप: दुर्बिणीने चित्रे उलटी दिसत असल्याने वरील छायाचित्रांतील ग्रहणाची स्थिती देखिल उलटी आहे.