आकाशामध्ये जर चंद्र नसेल तर तार्यांवरुन देखिल दिशा ओळखता येतात. रात्रीच्यावेळेस तार्यांचे साधारणपणे थोडावेळ निरीक्षण केल्यास आपणास तारे पृथ्वीभोवती गोलाकार फिरताना कुठल्या दिशेने उगवितात ते कळेल, त्यावरुन पूर्व दिशा कुठली ते कळेल आणि सहाजिकच त्यावरुन जर आपण 'पूर्व' दिशेला तोंड करुन उभे असाल तर आपल्या डाव्या हाताकडील दिशा ही 'उत्तर दिशा' व उजव्या हाताकडील दिशा ही 'दक्षिण दिशा' तर आपल्या पाठिमागची ही 'पश्चिम दिशा' हे आपल्याला कळेल.
अशाप्रकारे वर सांगितल्याप्रमाणे जर उत्तर दिशा आपल्याला कळल्यानंतर जर आपण काहीवेळ उत्तर दिशेकडील तार्यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला आढळेल की तेथिल तारे एक छोट्याश्या रिंगणामध्ये गोल फिरत असून तेथिल एक तारा एकाच ठिकाणी स्थिर जाणवेल, तोच पृथ्वीचा "धृवतारा". |