पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

कंकणाकृती सूर्यग्रहण २०१० - १५ जानेवारी २०१०

 

दिनांक १५ जानेवारी २०१० रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण मध्य अफ्रिका, मालदिव, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, उत्तर श्रीलंका, बर्मा करीत चिन मध्ये संपणार आहे. तर भारताच्या इतर भागातून हे खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल. साधारण ३०० कि.मी. व्यासाच्या पट्यातून हे सूर्यग्रहण दिसेल. या ग्रहणाचा कालावधी साधारण १०.०८ मिनिटे एवढा असेल. संपूर्ण भारतामध्ये सूर्यग्रहण रामेश्वरम हे ठिकाण फार चांगले आहे.

खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे मधल्या लाल ठळक रेषेच्या पृथ्वीवरील शहरांमध्ये संपूर्ण खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल. तर या व्यतिरिक्त या निळ्या ठळक रेषेच्या बाजूला दाखविलेल्या फिकट निळ्या रेषेच्या जागेमधील शहरांमध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये पाहायला मिळेल.


संपूर्ण भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार असले तरी निरनिराळ्या राज्यांमधून हे सूर्यग्रहण कमी-अधिक स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेमध्ये दिसेल. मुंबईच्या वेळेप्रमाणे सकाळी ११.१७ वा. दक्षिण आकाशामध्ये बराच वर आपल्याला सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली दिसेल. तर दुपारी ३.०५ वा. पर्यंत हे ग्रहण संपलेले दिसेल तो पर्यंत सूर्य आपल्याला पश्चिम आकाशामध्ये सरकलेला दिसेल. खालील जागेमध्ये महाराष्ट्रातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये कसे दिसेल याचे ऍनिमेशन दाखविले आहे.

 
खालील जागेमध्ये भारतातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून पाहात येईल याचा नकाशा दिलेला आहे.

वरील नकाशावर क्लिक केल्यास तो मोठ्या आकारामध्ये पाहाता येईल.

 

वरील चित्रामधिल ऍनिमेशममध्ये गोलाकार आकारामध्ये सरकणार्‍या सावळीमध्ये सूर्यग्रहणाचा मार्ग दाखविलेला आहे. तसेच या गोलाकार सावळीमध्ये असलेल्या काळ्या ठिपक्याच्या जागेमध्ये पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.

 

सुचना :

उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नका, त्यामूळे तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते.  सूर्यग्रहण पहाण्यासाठी त्यासाठी बनविलेले खास चष्मे वापरले जातात. या चष्म्यांद्वारे सूर्याकडे पाहिल्याने सूर्यापासून येणार्‍या हानिकारक अल्ट्राव्हाओलेट आणि इन्फ्रारेड किरणांचा आपल्या डोळ्यावर परीणाम होत नाही.

 

खालील जागेमध्ये महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणाहून ग्रहण दिसण्याचा कालावधी दिलेला आहे.

शहर स्पर्श शेवट

मुंबई

११:१६:४४

०३:०४:२९

ठाणे

११:१७:५१

०३:०४:५४

पुणे

११:१८:३०

०३:०६:४६

रत्नागिरी

११:१२:५४

०३:०५:०९

कोल्हापूर

११:१४:४५

०३:०६:५९

सातारा

११:१६:४६

०३:०६:५३

नाशिक

११:२२:११

०३:०६:४६

अहमदनगर

११:२२:३५

०३:१८:४५

पणजी

११:१०:३६

०३:०५:४२

धुळे

११:२७:३५

०३:०८:५४

जळगांव

११:२९:५४

०३:१०:३३

वर्धा

११:३७:३८

०३:१६:१६

यवतमाळ

११:३५:२९

०३:१५:२६

बीड

११:२५:१६

०३:१०:४९

सांगली

११:१६:२७

०३:०७:५०

सावंतवाडी

११:११:३६

०३:०५:५१

सोलापूर

११:२२:२२

०३:१०:४७

नागपूर

११:४०:०५

०३:१७:१४

अमरावती

११:३५:४८

०३:१४:४९

अकोला

११:३३:१०

०३:१३:२३

औरंगाबाद

११:२६:१९

०३:१०:०१

भुसावळ

११:३०:३२

०३:१०:५८

परभणी

११:२८:५५

०३:१२:४९

नांदेड

११:३०:३६

०३:१४:०२

उस्मानाबाद

११:२४:००

०३:११:११

भंडारा

११:४१:२५

०३:१८:०२

चंद्रपूर

११:३७:४३

०३:१७:१९

बुलढाणा

११:३०:१८

०३:११:४६

ग्वाल्हेर

११:३५:१०

०३:११:००

इंदूर

११:४९:३८

०३:१४:२२

बेळगांव

११:१३:३८

०३:०७:१७

 

चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरताना पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा त्याची सावली पृथ्वीवरील ज्या भागामध्ये पडते त्या भागांमध्ये सूर्य चंद्रामुळे काही काळासाठी झाकलेला दिसतो व आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळते. खालील जागेमध्ये सूर्यग्रहण कशाप्रकारे होते ते दाखविलेले आहे.

 

चंद्राचा पृथ्वीभ्रमणमार्ग साधारण ५ अंशांनी कललेला असल्याने चंद्र दर वेळेला जरी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आला तरी त्याची सावली पृथ्वीवर पडत नाही, त्यामुळे फक्त त्याच वेळी सूर्यग्रहण पाहायला मिळते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडते.

 

ग्रहणासंबंधीच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी